मराठी
३२८. सामर्थ्यदात्या ख्रिस्तस आवाहन
ये,ये, सैन्याधिशा, त्वरे,
ये बद्धांना सोडावं रे
सैतानें जंजिले अती
हे तुझे तुला शोधितो .. १
करा करा हर्षा कसे,
प्रभू पुढें उभा दिसे ...धृ
अंधारीं कोंडिलें जना,
तूं येई वारीं यातना
जिंकोनि मृत्यू , दे जया
तूं त्यांना, दावीं ये , दया ... २
ये,ये , सारीं दुरीं तमा,
ये तेजोमूला उत्तमा,
रात्रीच्या ह्या मेघांप्रती
निसारी, हे तेजस्पती ...3
स्वर्गद्वाराची तूं खरी
किल्ली ये आमुच्या करी
वाटा दु:खाच्या संपल्या
वाटा सौख्याच्या लाभल्या ...४
ये, ये, ये, ये, ये, शीघ्र ये,
सामर्थ्याच्या कंदा स्वयें,
काली कैशाही फांकती
नीतीच्या सूर्याच्या ध्युती ... ५
------ ना. वा. टिळक
________________________________________________________
३२९. यात्रेकरूंचा नेता
यात्रिका, प्रभो, मला तूं
या रानांत चालवीं,
आसरा दे दुर्बलाला,
भितीलाही घालवी,
दिव्य साचे
अन्न तूचिं पुरवी ...१
प्रस्तारा विदारूनियां
जीवना आम्हा दावीं
अग्निमेघ देउनियां
स्वर्गमार्ग सुचवि
रे समर्था,
ये मला तूं निभविं... 2
यार्देन तीरी येतांना
मन्मनास शांतवी,
पार ने मला स्वहस्तें,
स्वर्गलोकीं पोचवी
वंदूं तुला
प्रभू देवा गौरवी ... ३
-------- एच. बॅलेएनटाईन
__________________________________________________________
३३०. भक्तास प्रभूची पदोपदीं गरज
प्रभू, हो जवळी क्षणोक्षणीं,
मनाला शांतवी तुझी वाणी ... १
साह्य तुझें लागे
पदोपदीं लागे,
पहा मी साह्य मागें , आतां लागे ... ध्रु
प्रभू, तूं असता टेका देशी,
मोहाची सत्ताही तूं मोडीशी ... २
तुजविणें जगणे जे ते वायां,
सुखदुःखामधीं मी धरीं पायां ... ३
प्रभू, तू आपली इच्छा कळिव
ती मान्य करण्या कृपा पुरिव ... ४
ख्रिस्ता हे विमल, परात्परा,
मला भक्त करीं तुझा खरा ... ५
---- हेफसिबा पी. ब्रूस