मराठी
३३१ आमचा विनेता येशू
ने अम्हांस, ख्रिस्ता,
दे विश्रांती, ताता,
वाटे जरि सुख नाहीं
शांत येऊ निर्भयेही,
हस्त धरुनी
नेई सदनीं ... १
वाट ओस जरि,
घोर दुष्ट वैरी
वेढिताती भीती जावो
धैर्य, आस, भाव राहो,
शत्रूंमधुनी
जाउ सदनी ... २
दु:ख हारूनियां
घोर टाळूनियां
मोहभुल लागतांना
स्धैर्य देई, धैर्यवान
तिर गाठूनी
पोचू सदनी ... ३
तोवरीं अशक्ता
हो, प्रभू, विनेता
स्वर्गवास मिळणार,
राखी शांत हो आधार,
आम्हां पोंचवि
देवसदनी ... ४
-------- शार्लेट सी. ह्यूम