मराठी
३३४ दिनांची प्रार्थना
प्रभू, आम्ही दीन प्राणी
तुजपुढें नमतो
तूं पवित्र थोर ज्ञानी
तुज आतां वंदितो
दे सदात्मा,
साह्य त्याचें मागतों ... १
प्रिय येशू, तव प्रीती
नित्य राहो अंतरी
आचराया दया, नीती
ने आम्हा मार्गावरी,
तव सेवा,
करूं जगू तोंवरि ... 2
तुज कैसें तोषवावें
रोज आम्हां शिकवीं,
प्रतिदोषा निवारावें
तुज दिसे सर्वस्वी
शुद्ध राखी,
मोहांतुनी सोडवीं ... ३
खरे आम्ही नीच पापी,
तरी दया दाखवीं,
परि झालों अनुतापी,
करिं क्षमा, शांतवीं
अंतकाळी
स्वर्गलोकी पोंचवीं ... 4
--------- मेरो ई. बिसल