संरक्षक ईश्वरकृपा

मराठी

३३५ संरक्षक ईश्वरकृपा अनंत भगवान् दीनांचा तारणार, सर्वानीं त्याला द्यावा मान, वर्णावे ऊपकार ... १ देवाची ममता भक्तांना राखीती ते पापांमध्ये पडतां तीच उद्धरीती ... २ ख्रिस्ताचें तेज थोर तो पुढे दाखवील, तेव्हां आम्हांला त्यासमोर पवित्र राहविल ... ३ संपूर्ण मंडळी त्यावेळीं मिळतां कृपा वर्णील सगळी, अपूर्वं ममता ... ४ हे प्रभु तेजवान्, तूं मोठा तारणार, अत्यंत थोर ज्ञानवान्, तुला स्तवितो फार ... 5 -------- एच. बॅलेएनटाईन