मराठी
३३६ देवकृपेचा प्रभाव
आम्हांला भगवान्
स्वपुत्र म्हणतो.
दयाळू देव हि कृपा
भक्तांना दावीतो ... १
पुढे वाढवूनी
आम्हा तो चढवी,
ख्रिस्तासवें उंचावुनी
त्यावाणी घडवी ... २
ही आशा धरूनी
टाकावा पापगाळ
हर्षांने दुःख साहुनी
टिकावें सर्वकाळ ... ३
हे बापा, तूं मला
स्वपुत्र म्हणवी,
देऊनी आत्मा आपुला
मनाला शांतवीं ... ४
तूं पुत्र मानीतां
उल्लास होतो फार,
मी आबा बापा गाउनी
कथिन हा उद्धार ... ५
-------- एच. बॅलेएनटाईन