मराठी
३३७ परस्परांस वृद्ध करणारें प्रेम
प्रीती परस्परे
आम्हांस जोडिती
देवाची सर्व लेकरें
प्रेमळ सोबती ... 1
ती देवचरणीं
विनंती अर्पिती,
तैं आस, भीती सगळी
समान धरिती ... २
दुःखेंहीं सारखी,
तैसेंच समाधान,
किं छळणूक सारखी,
हैं सारिखें कल्याण ... 3
वियोग घडता
तयांस खेद फार,
तरी राहील ममता,
पुन्हाहि भेटणार ... 4
हि आस धरुनी
न धैर्य टाकितों,
मिळुनच स्वर्गसदनी
हा वाट पाहतो ... 5
दुःखें व कष्ट तैं
हीं सर्व संपती,
तैं सर्व सौख्य प्रीतीचे
सद्भक्त भोगिती ... ६
-------- एच. बॅलेएनटाईन