३३८. भक्तांचा सहवास

मराठी

३३८. भक्तांचा सहवास ऐका भक्तमंडळी, मी जगांत हिंडलों, फार सुखे पाहीलीं शांति नाहीं पावलों ... १ येई मी तुम्हांकडे, मोह मागे टाकीतों, अर्चनाही आवडे, हा विसांवा मागतों ... २ मी न कोठे हिंडता, राहें तुम्हासंगतीं, जगतां व मरतां तुम्ही माझे सोबतीं ... ३ एक आमुचा पिता एक प्रभू गौरवी शुद्ध होऊनि त्राता पाहुं राहुं वैभवी ... ४ -------- एच. बॅलेएनटाईन