३३९. देवभक्तांची धन्यता

मराठी

३३९. देवभक्तांची धन्यता देवपुत्र भाग्यवान् तेचि पावती कल्याण, ख्रिस्तरकते तरती, प्रेमानंदै डोलती ... 1 त्यांचीं पापे खोडिली, ख्रिस्तामुळे सोडिली चुकवुनी पाप घोर नांदती देवासमोर ... २ ते सदात्मा बाळगून जोडीती मनीं सद्गुण, प्रीती, शांती, नम्रता, करुणा, पवित्रता ... 3 ते जगीं प्रकाशती, ईश्वराची संतती, स्वर्गीं पूर्ण होती, जाण, बापासम तेजवान ... 4 -------- एच. बॅलेएनटाईन