मराठी
३४१. प्रभूवरील प्रेम
लोपोत हि सुखे,
माझा प्रभू
हे पूर्ण ठाउकें
माझा प्रभू
अंधार माजला,
पृथ्वी न दे स्थला,
येशूचं राहिला
माझा प्रभू ... १
मोहू नका मला
माझा प्रभू
हा जीव रंगला
माझा प्रभू .
हे भोग मृत्तिका.
हा स्वप्न ठाउका
मी ह्यांस भूलु का
माझा पभू ... 2
स्वप्ना, नमोस्तु रे
माझा प्रभू
कांहीं अता नुरे.
माझा प्रभू
यत्ना किती जरी
केले वृथा तरी,
त्याची कृपा खरी,
माझा प्रभू ... 3
जा, जा अनित्यते
माझा प्रभू
ये धाव, नित्यते
माझा प्रभू
या प्रीतिशांतिनो
विश्रांतिमुक्तिनो
सानंद मी म्हणों,
माझा प्रभू ... ४
-------- ना. वा. टिळक