३४२. प्रभूवरील प्रेम

मराठी

३४२. प्रभूवरील प्रेम तूं प्रिय, हे प्रभू, तूं प्रिय अपार , तूं प्रिय, हे येशू , तूं केला उद्धार मला तूं सुप्रिय, हें कैसें दावीन संपूर्ण शक्तिनें मी तूला स्तवीन ... १ हे प्रभु, मी करी आनंद महान् तूं जीवन देशी, अमोल्य हें दान मी वर्णीन प्रेमळ तुझा स्वभाव वर्णीन मी तुझे सुवंदित नांव ...२ या प्रिय प्रभृला मिळेना समान, पृथ्वीत स्वर्गीही तो राजा महान सुमिया, सुवंद्या, मी गाईन प्रेम हे येशु, तूं केलेलं अखंडित क्षेम ... ३ -------- एच. बॅलेएनटाईन