मराठी
३४३. ख्रिस्तप्रीती
प्रभूची प्रीती पतितांवरी
शास्त्रांत वर्णिली पाहा खरी,
तेथे आढळली सुवार्ता ही,
ख्रिस्त हा तारील मजलाही ... १
आतां सदा आनंदित मी,
मजलाही ख्रिस्त तारी
आतां सदा आनंदित मी
सुवंद्य प्रीति ती ... ध्रु
मज लाचारास उद्धाराया
प्रेमें तो आला जगीं राहाया,
प्रेमेंच खांबीं प्रभु टांगला,
म्हणून तो अति प्रिय मला ... २
प्रिय ख्रिस्ता कधी विसरतो
तरी तो मला नची सोडितो,
ही अनिवार प्रीती स्मरुनी
शरण जातो त्या मी रडुनी ... ३
कशी ती प्रीती कळे तुजला
कोणी विचारी जरी मजला
तरी सदात्मा बोले अंतरी,
तुजवरी ख्रिस्त प्रीती करी ... ४
ह्या विश्वासात समाधान फार
ख्रिस्त मजला कधी न टाकणार
सैतानसत्ता नाहींशी होती
जेव्हा मी वर्णी ख्रिस्ताची प्रीती ... ५
आहा मी स्वर्गाशी जाईन वर,
पाहीन जेव्हा तो राजा सुंदर,
तेव्हां गाईन दूतांसंगती
ख्रिस्ताची अपरिमित प्रीती ... ६
-------- एच. बॅलेएनटाईन