मराठी
३४४. येशूचें अनुकरण करणें
येशू जीवाचा तारणार,
वर्ते आकाशी गेला पार,
मी त्याला अनुसरूनी,
मार्गी चालेन झटूनी ... १
पहा तो येशु त्या खांबावरी
तुम्हांआम्हांला उद्धरी,
पाप्यांचा दंड पत्करी,
मरे तो येशू त्या स्वांबावरी ... ध्रु
ज्या मार्गी साधु चालले
भविष्यवादी सगळे,
तेणें चालेन, हा निश्चय,
त्या मार्गी शांती अतिशय ... २
कुमार्गी जै मी चाललों
सर्वस्वी जै बिघडलो
तै प्रभु दावी प्रेम फार,
बोले, मी वाट, धे उद्धार ... ३
प्रभु, मी आलों हर्षवान
मला तूं आपुलेंसें मान,
मी देऊ दान कोणते
तं दे स्वपुण्य पूरते ... ४
सर्वाला प्रेमें सांगुनी
दावीन मार्ग जीवनी,
तुझ्या रक्ताला दाखवून
म्हणेन. मुक्ती याकडून ... ५
-------- एच. बॅलेएनटाईन