मराठी
३४५. येशूची लाज वाटणे
येशू तू राजा तेजवान
उद्धरीताहि स्तुतिमान्
कैसे मनुष्य भ्रमती,
तुझी त्यां लाज वाटती ... १
येशूची लाज वाटणे
हें सूर्य तुच्छ मानणे
जे अंधकार व्यापितो
तै मना तो प्रकाशितो ... २
येशूची लाज वाटण,
मूर्खपणेच वागणे,
करील मात्र तो उद्धार,
त्याचे अनंत उपकार ... ३
पापाचा रोग नस्ता
येशू आम्हा न लागता
दंडित आम्ही दुबळे,
दुःखित, दुष्ट, खंगले ... ४
येशूच्या पायिं लागतां
मला संतोष पुरता,
लज्जा ही ती, दयाघना,
तुझ्या केलें अपमाना ... ५
मला ही आस मानसीं
कि प्रभू नायदिवशी
मला नाहींच टाकणार
की माझी लाज राखणार ... ६
-------- एच. बॅलेएनटाईन