मराठी
३४६. अमोल ख्रिस्त
ख्रिस्ताचे प्रेम सांगाया,
मी जड, मी दुर्बळ
दे शक्ति, देवा, प्रेरर्नी,
कीर्ती तुझी ती गायनी
वर्णीन मी सोज्वळ ... १
स्वरक्त कैसें अर्पूनि
पाप्यांचि करि खंडणी
हें ख्रिस्तपुण्य वैभवीं
मला झगा हो तेजस्वी
स्तवूनि वंदणार ... २
स्वर्गाप्रती उंचावला,
प्रेमा अनंत दाविला
गाइन सुस्वरे
कैसे परी हें करवेल,
संपूर्ण कसे वर्णवेल
केव्हां संपेल रे ... ३
मला सुवेळी बोलावील,
मला स्वमुख दाखवील ,
वंद्य ख्रिस्ता पाहीन
तो तारिता, सन्मित्र तो
अत्यंत प्रेमा दावितो,
मी नित्य त्या स्तवीन ... ४
------- मेरी ई. बिसल