मराठी
३४७. आमचा आधार प्रभू
देवबापा, तूं कृपेनें
स्वर्गमार्ग दावीला
प्रतिवर्षी ममतेने
दुःख खेद वारिला
रानीं मी बहकतांना
तूं सदैव शोधिलें
संकटेहि लागतांना
तूं मला उद्धरिलें ... १
शत्रु फार आडवीती
सर्व धूर्त शक्तिमान
भारि मोह त्रासवीती
जोंवरी कुडींत प्राण
तूं, प्रभू, मला दे शक्ति
तूंच एकटा आधार
तूं भक्तास देशि मुक्ती
पापसंकटे निवार ... २
तूंच ने मला मार्गाने
तूजठायी ठेविं भाव
चालवी स्वतां करानें,
आपुल्या सेवेस लाव ... ३
पापमोह घालवूनी
चित्त स्थिर तूं करी
आत्मप्रीती दाखवूनी
मन्मनीं प्रीती भरिं ... ४
-------- एच. बॅलेएनटाईन