३४८. प्रेमाविषयींचा प्रभूचा प्रश्न

मराठी

३४८. प्रेमाविषयींचा प्रभूचा प्रश्न जीवा, ऐक कोण तो प्रभू तूला बोलतो म्हणे बोल मजशी सख्या, प्रीती करिशीं ... १ तुला मीच तारीलें, बंदांतूनी सो डीले पापभ्रम काढीला सत्यमार्ग दाविला ... २ आई प्रेम दावी फार, आस्थाही जरी अपार. विसरे कधीं बाळा मी स्मरें सदा तुला ... ३ माझा प्रेमा चढतो उंच स्वर्गापावेतो खोल सिंधु जेवढा, जिंकी मृत्यू एवढा ... ४ थोडे धैर्य धरीशी माझे तेज़ पाहाशी सन्निधींहि बैसशी सख्या, प्रीती करिशी ... ५ प्रभू पाया पडतो प्रीती खरी करीतों प्रेमा अल्प वाढवी कृपामेधां वर्षवीं ... ६ ----- हेफसीबा पी. ब्रूस