३४९. देवाच्या सानिध्यांत चालणे

मराठी

३४९. देवाच्या सानिध्यांत चालणे हे देवा, तूझ्या संगतीं चालाया इच्छीतों, लागोच चित्त वरतीं, प्रकाश मागतो ... १ मार्ग तुझा मी चुकलों, अस्थिर झालें मन, भक्तांचें सैौख्य मुकलों, ही खोंचे आठवण ... २ हे आत्म्या कृपा दावुनि आतां माधारें ये, माझ्या दुःखा शांतवुनी राहें मनामध्ये ... ३ पूर्वी ज्या पापांनीं तुला मीं दिलें खेदाला त्यांना धिक्कारूनी करीं मी स्वनिषेधाला ... ४ जें अति प्रीय मानिले तें सर्व टाकीतों मानीन तूला एकलें, मी साह्य मागतों ... ५ नित्य देवाच्या संगतीं मी असा चालणार, लागेल चित्त वरतीं, होई प्रकाश फार ... ६ -------- एच. बॅलेएनटाईन