मराठी
३५१. श्रद्धायुक्त आयु:क्रमण
अंधारच्याप्त असतां
विश्वासें आम्ही चालतों
गृह स्वर्गीय शोधितां
विश्वास वाट दावितो ... १
नेत्रांस तीं अदृश्यमान,
विश्वासें स्पष्ट दीसती ,
त्रिभुवनेहि दृश्यमान,
प्रभा स्वर्गीय पोचती ... २
विश्वासें हो प्रकाशले
हें रान कंटितो खुशाल,
वारे सुटोत , वादळे
सिंह गर्जोत विकराळ ... ३
भाव तसाच धरुनी
अब्रामें देश सोडिला
पुढे विश्वासें पाहुनी
हर्षें खनांनी चालला ... ४
-------- एच. बॅलेएनटाईन