मराठी
३५२. पुरवठा करणारा प्रभू
भक्तांसी जे लागे
प्रभू पुरवी
माझ्या मागे नाही
तुझ्याही न पाही
परी स्वमार्गाही
प्रभू पुरवी ... १
पाहा केव्हा तरी
प्रभू पुरवी
नसो माझ्या काळी
कीं तुझ्या सुवेळीं
तरी यथाकाळी
प्रभू पुरवी ... २
निराशा न व्हावी
प्रभू पुरवी
सद्वचन त्याचे
नाही ढळायाचे
हें प्रमाण साचे
प्रभू पुरवी ... ३
हर्षाने चालावें
प्रभू चालवी
मार्ग तू कमूनी
विजयी होऊनि
गाशील स्तवुनी
प्रभू पुरवी ... ४
------- मेरी ई. बिसल