मराठी
३५३. संकटात देवाचा धावा करणे
देवा संकटे आली
भांबावून मी गेलो
तुझ्यापाशी ह्या वेळी
आशायुक्त मी आलो ... १
ते काहूर दुःखाचे
आले केवढे आले
बोलू काय मी वाचे
ये ये धांव या वेळे ... २
प्रात:काळ सौख्याचा
येतां गीत मी गातो
संध्याकाळ चिंतेचा
येतां मी तुला ध्यातों ... ३
घोर अंधकारी हि
भीती कोठुनी राही
माझी काळजी वाही
नाही दूर तो नाही ... ४
------ ना. वा. टिळक