मराठी
३५५. आग्रहाची प्रार्थना
येशू हा जाणतो
भक्तांच्या भावना
तोच दिनांला म्हणतो
या करा प्रार्थना ... १
ते काहीं मागतां
तो प्रेमें देतो कान
कोणी विनंती करिता
थकू नयेची जाण ... २
तो करिता उशीर
मागा हो फार वेळ
ठोठावा द्वार हो सुधीर
सुवेळी उघडेल ... ३
येशूचे प्रिया लोक
करिती प्रार्थना
तों कळे त्याला त्यांचा शोक
येतीही करुणा ... ४
हें आम्ही स्मरुनी
मागावें वारंवार
सुवेळी कृपा दावुनी
साधील पूर्णोधार ... ५
-------- एच. बॅलेएनटाईन