३५७. धन्यवाद

मराठी

३५७. धन्यवाद धन्य ते धन्य खरे जगती धन्य जयांना प्रभू येशूची मधू वाणी वदती ... ध्रु दीन जे आत्म्याचे असती धन्य खरे ते, स्वर्गावरती राज्य सदा करिती ... १ सदा जे शोकाकुल होती धन्य धन्य ते सदैव सांत्वन सत्सुखं भोगिती ... २ जयांच्या नम्रपणा चित्तीं धन्य पृथ्वीचे वतन तयांचे काय तया कमती ... ३ भुकेले धर्मास्तव असती धन्य तेच हो, चालून आली त्यांच्या घरी तृप्ती हो ... ४ ज्यांची दयापूर्ण वृत्ती धन्य, तयांवर दया सदोदित देवाची होती ... ५ मनाचे शुद्ध खरे सुकृती, पुढे आपुल्या परमेशाला तेच सदा बघती ... ६ जगिं जे संधी शांती करिती धन्य तयांना जगदीशाची संताने म्हणती ... ७ प्रभूस्तव छळ ज्यांचे होती धन्य, राज्य स्वर्गाचे आले त्यांच्या हो होती ... ८ विटंबन जरी तुमचें करिती, दु:सह दु:खें लोक तुम्हांला निष्कारण देती ... ९ शेवटीं खोटेही वदती, मजसाठी परी दोष तुम्हावर मळतेसे रचिति ... १० तुम्ही तरी पथ खरे जगती, खरी प्रभूवर, तुमच्या तुमची नकुंल्प ती प्रीती ... ११ परा हि जयशोवे जगती, आनंदाला महापूर हो येऊ द्या चित्तीं ... १२ ---- ना. वा. टिळक