३५८. संतमाहात्म्य

मराठी

३५८. संतमाहात्म्य धन्य धन्य ते ते श्रावयाचे जे दीन , तपांच्या अधीन स्वर्ग झाला ... १ धन्य धन्य ते जे शोकाकुल होती सांत्वन पावती निश्चय हा ... २ धन्य तेही जे जे नम्रता वरिती, पृथ्वीचे भोगिती पतन ते ... ३ नीतीची जयांना लागली तहान धन्य तेच जाण, तृप्ती त्यांची ... ४ धन्य जे दयाळ, दयापात्र ते ते, देवाला पाहते शुद्ध चीत्त ... ५ संधी जे करिती धन्य तेही धन्य देवाचे संतान तेच होती ... ६ नीतीस्तव ज्यांच्या पाठीस लगती धन्य ते पावती स्वराज्याला .. ७ मदर्ष तुम्हांला निंदिती, छळीती , विरुद्ध बोलती खोटेपणे ... ८ धन्य तुम्ही, तेव्हां तुम्हां श्रेष्ठ फळ तयाचे स्वर्गामाजी ... ९ ---- ना. वा. टिळक