३५९. ख्रिस्तशिष्य

मराठी

३५९. ख्रिस्तशिष्य वधस्तंभ हेंच आमुचें भूषण, सदैव निशाण उभारिले ... १ जगाच्या कल्याणा तनु आणि जीव वाहिला सदैव ख्रिस्तासाठी ... २ अडव्या नडव्या देऊ आम्ही हाता सोसूनीया लाथा जगताच्या ... ३ प्रितिभूमीवरी पेरी बीज ख्रिस्त, त्याचा हा प्रशस्त धर्मतरु ... ४ या हो, या हो चाखा दिव्य फळ ह्याचें, अमरपणाचे साधन हे ... ५ दास म्हणे, आम्ही कधी न संतप्त, सादाचेच तृप्त ख्रिस्तशिष्य ... ६ ---- ना. वा. टिळक