मराठी
३६०. ख्रिस्ती मनुष्याच्या जीविताची दोन अंगे
खड्गाहून तीक्ष्ण आम्ही ख्रिस्तशिष्य
लाजवू फुलांस मार्दवाने ... १
जगाचा आमुचा सदा उभा दावा,
जगाचीच सेवा रुचे आम्हां ... २
सदाचे भीकारी, सदाचे श्रीमंत,
निंदित वंदिती दोन्ही आम्हा ... ३
सदाचे मेलेले , सदाचे जिवंत,
अलौकिक ख्रिस्त करी आम्हां ... ४
दास म्हणे, आम्ही सदा बाटलेले
आम्हीच सोवळें ख्रिस्तासंगे ... ५
---- ना. वा. टिळक