३६१. ख्रिस्तशिष्य

मराठी

३६१. ख्रिस्तशिष्य मन माहेर धैर्याचें पुन्हा पापभीरुत्वाचे ... १ मोल वाटे जें प्राणाचें तेच ज्याला कर्तव्याचें ... २ निश्चयाचें अधिष्ठान, ख्रिस्ती जडलेलें ध्यान ... ३ धन, मान, कीर्ति ज्याची प्रीतेि अखंड देवाची ... ४ दास म्हणे, तो ख्रिस्ताचा शिष्य ओळखावा साचा ... ५ ---- ना. वा. टिळक