मराठी
३६२. देव माझा स्वामी
मन माझे नाहीं, नाहीं
तुझे, देवा, तूंच घेई ... १
जातां दूर ओढीं ह्याला
जशी माता बालकाला ... २
माझे मन मला ठावें
हानें मज बूडवावें ... ३
नको मला ह्याची सत्ता,
घांव, पाव, भगवंता ... ४
पीडा करीं ह्याची दूर,
मग धाडीं कामावर ... ५
दास म्हणे, लेकराचें
मन हवाली बापाचे ... ६
---- ना. वा. टिळक