३६३. अध्यात्मिक युद्ध

मराठी

३६३. अध्यात्मिक युद्ध सेवक तव समरधीर चाललो झुंजाया ... ध्रु रथ माझा रम्य काय ध्वज तूझे सदय पाय अश्व विवेकाद्युपाय चाललो लढाया ... १ प्रीति, नीति, विनय, भक्ति, दुर्धर या घोर शक्ति योजून मी शत्रुप्रति लावितों रडाया ... २ चिंता, भय, विरह, शोक पाप, मोह, मरण, नरक, शत्रुसैनिकांस देख लावितों मराया ... ३ ख्रिस्त शूर सेनाधव करिल पूर्ण हैं आहव मिळविन मी मग अभिनव मुगुट भूषवाया ... ४ ---- ना. वा. टिळक