३६४. ख्रिस्तानंद

मराठी

३६४. ख्रिस्तानंद ख्रिस्तहर्षाची रुची प्राण्या मणी घेई त्वरे मानसिक व्याधी तव जाउनिया चित्त तरे ... १ घन जसे अंतराळी धावताती वायुबलें प्रभूवच पाळण्यास थोर सुखें चित्त स्फुरे ... २ सहजचि बापावरी प्रीती जशी ख्रिस्त करी, तेचि मनी वाहतील मोदाने त्या प्रितिझरे ... ३ स्मितमुख नित्य तुझें होई तदानंदे बहू, भवभयंताप झणी जाऊनियां हर्ष भरे ... ४ परहित ख्रिस्तासम नित्य करायास हद्दी अतिशय लालसाही वाटतसे प्रेमभरे ... ५ ------- सु. वि. करमरकर