मराठी
३६६. नम्रता
नम्र होता, आत्मस्थिती
पापस्मच दिसती ... १
जों जों करावा विचार
मणी दिसतो अंधार ... २
पापें पूर्वीची सकाळ
दिसताति अमंगळ ... ३
भ्रष्ट दुष्ट मी सर्वांत
मनीं नम्र हा निभ्रांत ... ४
ऐशी स्थिती माझी मला,
ख्रिस्ता, दाखिव, दयाला ... ५
----- कृ. र. सांगळे
______________________________________________________________________________
३६७. अभिमानाचा त्याग
मना, प्रभू तुज व्हावा ना व्हावा ना
सोड सोड तर अभिमाना ... ध्रु
निंदास्तुतीच्या भारांना - भारांना
सुखें वाहूं दे पोरांना ... १
सानपणा वा थोरपणा - थोरपणा
नको भुलूं मानामाना ... २
मना, वहा रे प्रभूचरणा - प्रभूचरणा
समग्र तूं अपणा - अपणा ... ३
---- ना. वा. टिळक