मराठी
३६८. नित्य नम्र वृत्ती ठेवणें
मनुजा भ्रमु नको, भ्रमु नको
नम्र सदैव रहा रे ... ध्रु
देवें दिधली बुद्धी,
करितो तोच तिची अभिवृद्धी ... १
पळ जितुका तूं पळशी
तरी नच कधीं दिगंता शिबशी ... २
देवाजीचा प्राणी
नर, हें नित्य असूं दे ध्यानीं ... ३
विक्रम ताव हे लीला
शिशुच्या त्या वत्सल बापाला ... ४
---- ना. वा. टिळक