३६९. विनयशील वृत्ती

मराठी

३६९. विनयशील वृत्ती पुरवूं दे मला अन्यांचें अभिष्ट, येऊ दे अनिष्ट माझ्या दैवीं ... १ अधिकाराहोनी कमीच मागेन असे मज मन दे, गा बापा ... २ सर्वांच्या पायांशी जागा शेवटली असूं दे राखिली माझ्यासाठी .. ३ तुझी इच्छा तीच असो, देवा, एवढाच व्हावा अनुग्रह ... ४ दास म्हणे, एक आणखी राहिलें ओळखून दिलें पाहिजे तें ... ५ ---- ना. वा. टिळक