मराठी
३७७. उदारपण
प्रभू येशू हो लोकहितास्तव
कष्ट सोसूनी मारी,
दया, शांती, औदार्य दावुनी
जनदु:खासी निवारी ... १
देहानें द्रव्याने तैसें
परदु:खें निर्सावीं
सकली प्रेमा समान ठेवुनी
शांती बहुत वरावी ... २
यावा पाहुनी मना कळवळा
दु:खी कोणी कसाही
द्रव्यें अथवा शरीरयोगें
साह्य द्याच लवलाही ... ३
दिनास्तव जें द्रव्य खर्चीले
व्यर्थ न होय कदा तें
आत्मिकरूपें परी वाढे तें,
अखेर अपणां येतें ... ४
------- वि. भा. करमरकर