३७८. दशांश

मराठी

३७८. दशांश देवाज्ञेनें मलाखी सांगे द्यावा प्राप्तीदशांश सफळच होती तुमचे तेव्हा राहती जे नव अंश ... १ कृपणपणाने देती त्यांना सौख्य ना होय कदाही, प्रतीती याची मजला आहे, अनुभवली बहुतांही ... २ औदार्याने, सरळ मनाने जे जे देते झाले, उणें कदापि त्या भक्तांसी देवें नाहीं केले ... ३ यास्तव विनवी दास प्रभूचा नच अव्हेर करावा, ख्रिस्तवरी हो भाव ठेवुनी पापबधी उतरावा ... ४ ------- वि. भा. करमरकर