मराठी
३७९. विधवेच्या दोन टोल्या
आनंदाने दोनच टोल्या
विधवेने टाकिल्या,
परी त्या प्रभूने मान्य करुनि
आवडीने घेतिल्या ... १
तुम्ही जर तैसे प्रभूला स्मरुनी
देतां संतोषानें,
तर तें प्रभू हा मान्य करुनि
घेई बहू आवडीने ... २
------ कृ. र. सांगळे
मराठी