३८०. कार्यकारी विश्वास

मराठी

३८०. कार्यकारी विश्वास विश्वास तारकावारी जिवंत धरिजे बाहेरी मात्र जो दिसे तो वर्ज करिजे जगी जे स्वैर चालती विश्वास त्यां नसे उद्धारा तें ना पावती तें ख्रिस्ती हो कैसे ... १ विश्वासें बुद्धी फीरूनी दुर्भाव मोडे ती, मनीं सतप्रीती दाटूनी निःस्वार्थी होई तो विश्वासें सारी हीं पापे ओंगळ वाटती सुमंगल ख्रिस्ताकडे मनीपा धावती ... २ विश्वासें भक्त जिंकीतो जगी पापें सारी मरायाला जें टंकतो तें हर्षे अंतरी, विश्वास ऐसा धरीतां जीवंत तो जाणा, तो देई शांती सर्वथा, अनंत कल्याणा. -------- एच. बॅलेएनटाईन