मराठी
३८१. दु:खी न राहण्याचे कारण
हे जिवा, तूं की रे दुःखी
तोंड का उतरले
हो अतां तूं हास्यमुखी,
टाकीं भय सगळे
येशू ख्रिस्ते
या जगास जिंकिले ... १
तुजला जरी सदाही
दुष्ट हेतू घेरिती
तुज तुझी देहबुद्धी
धोर पेंचि पाडिती,
जिंकशील,
ख्रिस्ती शक्ति मीळती ... २
ह्या जगी वाढोत वैरी,
दुःख होउं दे अपार
येशु हो तुझा कैवारी
नाहिँ तो विसंबणार
तो विश्वासू
पूर्ण तो करी उद्धार ... ३
कंठितां सन्मार्ग मध्ये
लोट वाहे विघ्नांचा,
प्रेम त्याचें तें बला दे
हे विसर स्वर्गीचा
गा तयाचा
प्रेमभाव येशूचा ... ४
-------- एच. बॅलेएनटाईन