मराठी
३८३. भक्ताचें सर्वस्व ख्रिस्त
ख्रिस्त माझा राहे जेथे
तेंच माझे मंदीर,
नित्य सेवावें ख्रिस्तांतें
हाच माझा संसार ... १
ख्रिसत माझे, ख्रिस्त माझे,
ख्रिस्त माझे सर्वस्व ... ध्रु
ख्रिस्त ज्यांचा बंधु ते ते
आप्त माझे जीवाचे,
सेविती जे प्रेमे त्यांतें
पाय सेवीं मी त्यांचे ... २
मान माझा, माझी शक्ती
ख्रिस्त माझी संपत्ती,
सौख्य सारे ख्रिस्ती भक्ती
संग त्याची, सच्छांती ... ३
ख्रिस्त येथे किंवा तेथे,
आज उद्या कल्पांती
व्यापी विश्वातेँ, कालातें
राहेि माझ्याही चीत्तीं ... ४
------- ना. वा. टिळक