मराठी
३८४. ख्रिस्तभक्तांचे धैर्य
भक्त असें मी येशूचा,
वीरहि त्याचा जाण,
पाहुनि शत्रुची सत्ता
का सोडूं अवसान ... १
मी सुखशेजिं नीजूनी
जाईन स्वर्गीीं काय
कीं दुःख निंदा टाळूनी
पाबेन ख्रिस्तपाय ... २
हे प्रभु, मज देई धीर,
मी युद्ध चालवीं,
सोसुनि संकटें गंभीर
तें राज्य मीळवीं ... ३
भक्त प्रभूचे लढूनी
विश्वासें टीकती,
प्राण खचित सोडूनी
जयास पावती ... ४
-------- एच. बॅलेएनटाईन