३८७. प्रभूचे भक्तावरील प्रेम

मराठी

३८७. प्रभूचे भक्तावरील प्रेम यापुढें, प्रभू, गुरु, राजा मज म्हणे, मित्र तूं माझा, यापुढे ... ध्रु यापुढे, तुझें जे ओझें ते माझें, न सख्या, तुझें यापुढे . यापुढें, अरे मम जिवा, ये करितो मी तव सेवा, यापुढें . यापुढें दुजी भावना, नको ताव मना आपुले नातें - आपुलें नाते, ठाऊक असू दे तूतें यापुढें ... १ किती कुणी विडंबन केलें, किती खिळे खोल हे गेले ह्यापुढें . मन्मित्रा, जरी तुजसाठी, फटके मज बसले कोटी, यापुढें, तरि तुझे कार्य रे जरी, साधलें तरी धन्यता सारि-धन्यता सारी मी तुझा खरा कैवारी यापुढे ... २ तुज सांठविला मीं हृदंयीं, तूं अगदीं माझा पाहीं यापुढे, अस येथे किंवा तेथे मी सोडित नाहीं तूतें यापुढे, ही अशी प्रभूची वाणी सदा मम कर्णी गुंजतें गान-दिव्य, मधु गान, प्रभु येशू माझा प्राण यापुढे ...३ ------- ना. वा. टिळक