३८८. ख्रिस्तविरहित जीविताची निरर्थकता

मराठी

३८८. ख्रिस्तविरहित जीविताची निरर्थकता कर सोडुन कोठे जाऊं मी दीन तुझा, प्रभुराया ... ध्रु हे गइन दुर्ग तवसंगे क्रीडावनसम मज होती लोटितों व्याघ्रवृक' हस्तें दूर, नसे मजला भीती: हें द्वार मृत्युचें रम्या वाटचि बा स्वर्गगृहा ती तूं दाविशी जेथे तेथे, ख्रिस्ता, मज शांतिप्रीती मम होता मान तुला तो किति प्रेमें येउन कथितों किति आत्मा रंगुन जातो प्रेमल तव वदन पहाया ...१ सुख माझे शतगुण करिशी गुजगोष्टी ऐकुन, देवाः मी श्रमतां अपुल्या हृदयीं मज देशी पूर्ण विसावा किति जपशी कीं मज वारा दुःखाचा नच लागावा तवसंगे दिन मम जातो केव्हा तो कोणा ठावा किती वेळां पद् घसरावे ते प्रेमें तै उचलावें मम मुखही कुरवाळावें, जीवन मज द्यावें प्याया ... २ हे सर्व जगाच्या नाथा, बघु तूझ्या करचरणांला हें रक्त पुरे रे देवा गहिंवर ह्या दासा आला तुज सोडिन नच मी कोणीं चरचर जरि कंठहि चिरिला, जरि चुकुनी फिरलों, बापा, तरि ओढीं मम हृदयाला प्रिय ख्रिस्ता माझ्या ख्रिस्ता मम आशासौख्यसमस्ता ही प्रीति न जावो अस्ता, मज दुसरं नच मागाया ... ३ ------- ना. वा. टिळक