३८९. नववर्षाकरितां प्रार्थना

मराठी

३८९. नववर्षाकरितां प्रार्थना नित्य रहा तूं हृदयीं माझ्या, ख्रिस्ता, ह्यापुढतीं, करी, करी रे, करीं सर्वथा त्वन्मय माझि मती ... ध्रु तुझ्या माझियामधे भयंकर येइल विघ्नतती, न ढळो परेि मम दृष्टि आज जी जडली तुजवरती अढळ जशी ध्रुव नक्षत्राची तैशिच होउ गती मम नयनांची; तुझ्याच पायि हीं होउत रमतीं ... १ तव वदनांतुन अमृताचि ही मधुधारा स्रवती, तिजवांचुनिया ऐकुं न येवो कांहिं मला जगतीं निरोप देवो तुझे जगाला, गावो तव कीर्ती , ह्याविण कांहीं वदो न रसना हीच अतां विनती ... २ हस्तपाद हे तव सेवेला त्यजुनी जरेि भ्रमती तरी पुरवले गळूनी गेले आणिक बोलूं किती तूं माझे मन तूं माझे धन, यश, भुक्ती, मुक्ती असेंच राहो वेड तुझें मज, ख्रिस्ता प्राणपती ... ३ ------- ना. वा. टिळक