३९०. प्रभुचरणी निमग्न होणे

मराठी

३९०. प्रभुचरणी निमग्न होणे हा वेडा गेला, पुरा जगाला मेला जा म्हणा हवें तर, प्रभू माझा मम झाला ... ध्रु जरेि भुकलों आतां क्षणभर प्रभुरायाला, तर गगन अग्नीचे कुंड वायुच्या ज्वाला प्रभुवाचून आतां ह्या अवघ्या भूगोला येईल भयंकर रूप न तें नरकाला मजमधून मी हें गेलें हरपलें. मजभधे नवें मी आलें सांचलें प्रभुमधे लीन मन झालें,लोपलें भी वेडा माझी विचित्र झाली लीला, परि हींत परी हित गवसलें अभीष्ट तें तें मजला ... १ ह्या जगांत अवघा सुखदुःखाचा काला, परि विषामृताचा भेद न हो मज उरला प्रभु भाझा दिसतो सकल जगी संचरला, हा स्वर्गाच अवधा प्रेमानंदें भरला ते परत्र, हें इह गेलें यापुढे, हें आज, तें उद्यां मेलें बापुडे लोपलें अशा द्वैताचें सांकडे प्रभुजीवन म्हणजे काय समजलें ज्याला हें वेङ उमगणे त्याच मात्र एकाला ... २ -------------- ना. वा. टिळक