मराठी
३९२. ऐहिक वस्तु प्रिय न वाटणें
प्रभु, नको जगीं, नको,
नको मज कांहीं
मज कांहीं प्रिय नाहीं
प्रभु, नको जगीं, नको,
नको मज कांहीं ... ध्रु
राज्य तुझे जगेिं वर्धन पावे,
हेंच प्रभो, मज व्हावें
अवघ्या मतिकृति ह्यांत सराव्या
मज कांहीं प्रिय नाही
प्रभु नको जगीं, नको,
नको मज कांहीं
दुःस्थिति अमुची नरनारींची
नयनीं बघ रे, ये रे
दयाळा, हताला नताला जगाला
तराया दुजा रे न थारा खरा
जय जय प्रभो जय जय प्रभो
जय प्रभो
प्रभु, नको जगीं, नको,
नको मज कांहीं ... १
-------------- ना. वा. टिळक