मराठी
३९३. देवाला शरण जाणें
मी दीन जाहलें लीन
तुझ्या चरणीं रे
तूं आश्रय माझा
समाधान सारें ... १
दे मला लाभ आपुला
प्रभो, दुःखाशीं
हा लाभ लोपवी
सकल अनिष्टांशीं ... 2
तव छंद खरा सुखकंद
तूंच मम माय
तूं बाप सखा
तूं तूंच बंधुराय ... ३
----------- लक्ष्मीबाई टिळक