मराठी
३९४. अंतरीं वास्तव्य करण्यास ख्रिस्ताला आमंत्रण
सखया, येई येई रे
दृढतर मजला आपुल्या हृदवीं
तूं धर धर तूं धर धर
सखया येई येई रे ... ध्रु
येई दयाळा ख्रिस्ता,
दार उघडीलें
सदन विमल जरेि नाहीं नाहीं,
तूं कर कर, तूं कर कर
सखया ... १
राहीं सदा तूं येथे
चालविं गृहातें
सकल तमस निज तेजें दिव्ये
तूं हर हर, तूं हर हर
सखया ... २
सोडू नको तूं केव्हा
या सदनातें
विपळभरहेि नच दुरीं दुरीं
तं सर सर, तूं सर सर
सखया ... ३
-------------- ना. वा. टिळक