३९६. भक्ताचें आक्रंदन

मराठी

३९६. भक्ताचें आक्रंदन तुझे पाय, तुझे पाय माझे चित्त नित्य ध्याय ... १ तुझे नाम, तुझे यश मुखीं नित्य मंगल घोष ... २ तुझी अहर्निश सेवा हाच देहाचा विसावा ... ३ हेंच दान दे गा देवा, माझ्या जीवाचीया जीवा ... ४ दास म्हणे दया येवो, मी तों फोडिताहें टाहो ... ५ ----- ना. वा. टिळक