३९७. मार्ग, सत्य व जीवन

मराठी

३९७. मार्ग, सत्य व जीवन अरे माझ्या बंधो, स्कंधीं तुझा हस्त जीव हा नीरस्तभय माझा ... १ अरे माझ्या पंथा, उभा तुझ्यावर दिसे रम्य घर माझे मला ... २ अरे माझ्या सत्या, तुवां आलिंगिले संदेह गळाले आपोआप ... ३ अरे माझया जीव, तुवां व्यापियलें मरण मेलेले माझ्यापुढे ... ४ दास म्हणे, आतां शेवटली दरी आज झाली तरी तिचे काय ... ५ ----- ना. वा. टिळक