मराठी
400. प्रभूविरह दु:सह वाटणें
संख्या ख्रिस्ता प्राणविसाव्या,
तुजविण मजला चैन पडेना ... ध्रु
जग हे अवघे व्यर्थचि भासे,
तुजविण माझी दु:सह दैना ... १
न रुची मजला अन्नजलाची
तुजविण निद्रा परकी नयनां ... २
मजला पतिता कोण विचारी
तुजविण, सदया पतितोद्धरणा ... ३
मजला त्यजितां तूं, मग मेलों
जगलो सम मी, संकटहरणा ... ४
नलगें दुसरें मजला काहीं,
ठेव निरंतर मधुसंघटना ... ५
तणू मी तव, तूं प्राणच माझा
ह्यापरी राहू, प्रियसंस्मरणा ... ६
---- ना. वा. टिळक