मराठी
४०१ ख्रिस्तावरील प्रेम
देवा, माझी ख्रिस्तपदि प्रीती गोड ... ध्रु
सच्छास्त्रमनंन करण्याकरितां
नच लागो आळसाची खोड ... १
भाविक भक्त करितात पोथी,
उपदेश बहू लागो गोड ... २
स्तुती प्रार्थनादी करितेप्रसंगी,
झोपेची सवयी हि मोड ... ३
सैतान मजला भारी छळितो,
सारें मस्तक त्याचें फोड ... ४
अगणित पापें करितों स्वतां मी,
ख्रिस्तामुळे सारीं सोड ... ५
तन, मन, धन, हीं अपूर्णी ख्रिस्ता,
व्हावा शेवट माझा गोड ... ६
-- कृ. र. सांगळे
__________________________________________________________________________________________
४०२. ख्रिस्ताचे मंडळींवरील प्रेम
माझा वल्लभ पाहा हाच
किती हो ममताळू ... धृ
होतें भटकत रानोरान,
ग्रासित होता मज सैतान,
प्रिये लगबग धावुनी जाण,
देउनी प्राण, सोडविलें ... १
आणिलें पोटी धरुनी घरांत,
मूर्च्छित पाहुनी रडला कांत,
धूवुनी जखमा त्या समयांत
फिरवी हात मजवरती ... २
शुद्धी आल्यावर मज कांत
स्नानही घाली निजरुधीरांत,
घेऊनि आत्मिक वजनी करांत
अतोनात मळ काढी ... ३
तारणवस्त्रें झांकुनि मांग,
फेडूनि जन्माचाहि पांग,
मजविण लागे कैसा थांग ?
म्हणतो, सांग, मम दयिते ... ४
प्रियाठायी ठेवीन भाव,
मी नच घेईन दुसरें नांव,
अक्षय जीवनि देईल ठाव,
ख्रिस्तच राव मजलागी ... ५
-- कृ. र. सांगळे
____________________________________________________________________________________________________________________
४०३. मनाला विनंती
मन तूं ध्याय ते पथ,
हा मात्र सदुपाय
पापा, अपाया हराया भावी ... ध्रु
त्रस्ता अपास्ता शिरी त्या धरित्या
ख्रिस्ता समस्तावना आचारीत्या
हा जीव, हा काय तू सोपवी
तें प्रेम निष्काम,
तें नित्य सुखधाम,
विश्रांत विश्राम तूं ध्याय
ख्रिस्ताचीया प्राप्त होतां अवस्थे
अस्तास जाती अभद्रें समस्तें,
तो नित्यतेच्या पदा पोचवी ... १
मन तूं ध्याय ते पाय,
हा मात्र सदुपाय
पापा, अपाया हराया भवी
-- ना.वा.टिळक
____________________________________________________________________________________________________________________
४०४. ईश्वरचिंतन
हजार संकटे येऊनि भिडोत
हजार झोंबोत रोग देहा ... १
होवो कडेलोट, बुडो राहो नाव,
परी माझा देव माझा राहो ... २
नको तो नरक तुझें विस्मरण,
एवढेंच दान दे, गा बापा ... ३
तूं माझी विश्रांती, तूंच माझें बल,
हवें तें सकल तूंच माझें ... ४
दास म्हणे, आतां श्वसनोच्छवसन
आणखी चिंतन तुझें एक ... ५
-- ना.वा.टिळक